About Us

आमच्याबद्दल

विवेक विचार मंच महाराष्ट्र राज्यात कार्यरत संघटना आहे. भारतीय राज्यघटना, घटनात्मक राष्ट्रवाद, संविधानिक लोकशाही मुल्यांवर आमची श्रद्धा आहे. भारतीय राज्यघटनेतील मूल्ये समाजात रुजवण्यासाठी आणि समाजातील धर्म, जात, भाषा, वंश, लिंग या आधारे होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी घटनात्मक मूल्यांबाबत सातत्याने जागृती करण्यासाठी मंच कार्यरत आहे.
समाज म्हणून आपण सामाजिक प्रगती करत असलो तरी समाजात जातीय भेद, अत्याचार व जातीय तणावाच्या घटना पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. त्याचप्रमाणे महिलांशी असलेली भेदभावपूर्ण वागणूकही पूर्णपणे नष्ट झालेली नाही. त्यामुळे समाजात आधुनिक संविधानिक लोकशाही मूल्यांची जागृती व जाणीव करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
त्याचबरोबर माओवाद, इस्लामिक जिहाद यांसारख्या धार्मिक कट्टरतावादी लोकशाहीविरोधी चळवळी देशात सक्रिय असून नागरिकांनी त्याबाबत जागरूक होण्याची गरज आहे. माओवादासारख्या समस्या केवळ दुर्गम जंगल भागातच नाही तर शहरी भागातही सक्रिय आहेत. समाजात सामाजिक द्वेष पसरवणे, फुटीर कारस्थान करून सामाजिक एकोपा व बंधुतेला आव्हान निर्माण करणाऱ्या माओवादी, फुटीरतावादी शक्तींचा खरा चेहरा समजात उघड करणे व यांच्या विरोधात कायदेशीर मार्गाने कार्य करणे.
वरील उद्देश लक्षात घेऊन ‘विवेक विचार मंच’ महाराष्ट्रात विविध परिषदा, कार्यशाळा आणि व्याख्याने, कार्यक्रम, उपक्रम आयोजित करते. तसेच ‘विवेक विचार मंच’ जातीभेद, जातीय तणाव व अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांबाबत सत्य शोधून समाजासमोर वास्तव आणण्याचे काम करते. तसेच अशा प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी विवेक विचार मंच विविध प्रकारची मदत करत आहे.